तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत अश्विन अमावस्याच्या सांयकाळी भेंडोळी उत्सव पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला. तीर्थक्षेत्र तुळजापूर हे संपूर्ण शक्तीपीठ असल्याने येथे नवदुर्गे बरोबरच अष्टभैरवाचे स्थान आहे. त्यात भैरव म्हणजे तीर्थक्षेत्राची देखभाल (संरक्षण) करणारी देवता होय. यामध्ये काळ, टोळ, रकत्याभैरवांचे स्थान असलेली छोटी-छोटी मंदीरे तुळजाभवानी मातेच्या चोही बाजूला आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेस दरीच्या पलीकडे डोंगर कपारीत काळभैरवनाचे सुंदर देवालय आहे. येथे प्रत्येक शनिवारी व अमावस्येला भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
दिपावली अश्विनी अमावस्येस सांयकाळी काळभैरवचे पुजन करुन आरती करण्यात. यानंतर ही भेंडोळी देविच्या पोताने अग्नी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी मंदिर महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, मंदिरचे तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी, वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, काळ भैरवाचे पुजारीसह काळभैरव, टोळभैरव भोपेपुजारी, मानकरी, सेवेकरी, भाविक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
आगीची ज्वाला असणारी भेंडोळी युवकांनी खाद्यांवर घेवुन काळभैरव मंदिरातुन खड्या पायऱ्या उतरुन महंताचा मठा समोर येताच येथे भेंडोळीस नैवध दाखवून महंत हमरोजी, गुरु चिलोजीबुवा, महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी भेंडोळीवर तेल ओतुन पुजन केले. येथे या भेंडोळीवर काही घागरी जल टाकण्यात आले. नंतर महंत तुकोजीबुवा मठा समोरील अडचणीच्या असणाऱ्या सवाफुट बोळातून ती सहजपणे शिवाजी दरवाजा मार्गे आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंह गाभाऱ्यात आणण्यात आली. येथे प्रदक्षणा मारण्यात आल्यानंतर देविच्या मुख्य गाभाऱ्यातील पुरातन अशा देविच्या दिव्यातील तेल त्यावर अर्पण करण्यात आले.
नंतर भवानी शंकर गाभाऱ्यातुन ती मंदीर प्रांगणातील श्रीदत्त मंदिरात येताच येथे दशावतार मठाचे महंत जे की वर्षातुन फक्त अश्विन अमावस्थेला देवीदर्शनार्थ येतात असे महंत मावजीनाथ बुवा यांनी भेंडोळीची विधीवत पुजा करुन होमकुंडासमोर प्रदक्षणा मारुन निंबाळकर दरवाजा, राजेशहाजी व राजमाता मा ँजिजिऊ महाध्दार मधुन महाध्दार रोड मार्ग ती कमान वेशी, बाहेरील डुल्या हनुमान मंदिरात आणण्यात आली. येथील मारुती मंदिराच्या पारावर याचे पुजन क्षिरसागर परिवाराने करुन अहिल्यादेवी होळकर विहीरीतील जलाने ही भेंडोळी अग्नी शांत (विझवली) केली. नंतर देविजींस भाविकांचे दही दुध पंचामृत अभिषेक करण्यात येवुन वस्ञोलंकार घालून नित्योपचार पुजा करण्यात आली.
हा अनोख भेंडोळी उत्सव देशातील केवळ दोन तीर्थक्षेत्रात साजरा केला जातो. एक म्हणजे तीर्थक्षेत्र काशी येथे फुलांची, तिर्थक्षेञी तुळजापुरात आगीच्या ज्वालाची ही भेंडोळी पाहण्यासाठी भाविक, स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.