धाराशिव (प्रतिनिधी)- तालुकास्तरीय बाल संरक्षण समितीच्या स्थानिक सामाजिक प्रतिनिधी पदी निवड झाल्याने गणेश रानबा वाघमारे यांचा सत्कार पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करण्यात आला. दि.9/10/23 रोजी बाल रुग्ण वार्डची तपासणी आरडिसी महेंद्र कांबळे, तहसिलदार शिवानंद बिडवे सह इतर अधिकारी यांनी केली असता गेल्या सहा महिन्यांत एकही बालकाचा मृत्यू नाही ही बाब कौतुकास्पद असल्याने बाल रुग्ण वार्ड मधील सर्वांचे अभिनंदन करण्यात आले होते. याची दखल घेऊन या सत्कार कार्यक्रमात बाल रुग्ण वार्डमधील परिचारिका व मावशी यांना देखील पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ यांनी शुभेच्छा देतांना म्हण्टले की,राज्यात गतकालीन रुग्णालयातील घडलेल्या अनुचित घटना कडे पाहता बाल रुग्ण दगावले. ही बाब शोकांतिक असुन बाल कामगार,बाल विवाह आणि बाळाचे संरक्षण,त्यांच्या न्याय हितासाठी ही समिती कार्य करते शासनाच्या वतीने गठीत केलेल्या समितीच्या स्थानिक सामाजिक प्रतिनिधीपदी गणेश रानबा वाघमारे यांची पाच वर्षांसाठी निवड झाली. ती त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील इतर कार्यांमुळेच,आज ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नैतिकतेच्या समितीवर,तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीच्या सदस्य पदी आहेत,तर वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी लाकाळ यांनी म्हण्टले की,श्री,वाघमारे यांची निवड सार्थ असुन त्यांच्या हातुन चांगल्या प्रकारे समितीचे कार्य पार पडेल असे मनोगत व्यक्त केले,मेट्रन मॅडम व इतरांनी ही आपापल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या,गणेश रानबा वाघमारे यांनी सत्कार केल्याबाबत सर्वांचे धन्यवाद मानले.या प्रसंगी रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,असंघटित कामगार संघटना कॉग्रेस सरचिटणीस संजय गजधने,रौफ शेख ब्रदर,बाबासाहेब गुळीग,वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी लाकाळ,बाल रोग तज्ञ डॉ भोसले,मेट्रन,बाल रुग्ण परिचारिका सुषमा शिंदे,परिचारिका निर्मला जमादार,अधिपरिचारिका सुनिता पवार,सिमा गायकवाड,क्रांती रणखांब, आदिमाया गोस्वामी,प्रज्ञा वाघमारे,ज्योती जाधव, राजश्री सावंत, धनश्री भारती,तर मावशी शामल जोगदंड,दयाबाई बलवंडे,मनिषा मिसाळ, उर्मिला साळुंखे अन्य इतर उपस्थित होते, सुत्रसंचलन रौफ शेख ब्रदर यांनी केले तर आभार संजय गजधने यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता रौफ शेख ब्रदर यांच्या शेरोशायरीने झाली.


 
Top