तेर (प्रतिनिधी)-पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दी संगीत महोत्सवात समारोप प्रसंगी अभंग रत्न गणेश कुमार यांच्या संकीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र ललित कला निधी,कला वर्धिनी आणि ग्रेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  तेर येथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी तेर येथील ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिरात अभंगरत्न गणेश कुमार यांच्या अभंगवाणी नामसंकिर्तनाने संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. 

सर्व प्रथम अभंग रत्न श्री गणेश कुमार, जगप्रसिद्ध संतूर वादक सतीश व्यास,गायक सुहास व्यास,शशि व्यास, अनिल व्यास यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणी मुर्तीचे पूजन व दिप प्रज्वलीत करून शुभारंभ करण्यात आला.अभंग रत्न गणेश कुमार यांच्या अभंग गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.त्याना व्हायोलिनवर डॉ. एम. नर्मदा, पखवाज वादन परितोष , मृदंग रोहीत प्रसाद, मुरसिंग पयनूर गणेश ,लतिका कुंभार, आनंद कुंभार,त्रत्गुविजा कुंभार या गुणीजनानी  सुरावटींचे रंग भरले.उपस्थितांचे स्वागत नरहरी बडवे, चंद्रकांत व्यास, सार्थक बडवे,नवनाथ पांचाळ, सदानंद पाटील,दिपक लिंगे, कल्याण कानडे, सुरेश बडवे, सुनिता बडवे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता पानसरे वाळवेकर यांनी केले तर आभार शशि व्यास यांनी मानले.


 
Top