धाराशिव (प्रतिनिधी)-धन्वंतरी दिनाचे औचित्य साधून येथील आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिव व रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

धन्वंतरी दिनाचे औचित्य साधून येथील आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिव व रोटरी क्लबच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शहरातील आनंद नगर भागातील सिध्दांत आयुर्वेद हॉस्पीटलमध्ये हे शिबीर घेण्यात आले. धन्वंतरी प्रतिमा पुजनाने शिबीरास प्रारंभ करण्यात आला. या रक्तदान शिबीराचे हे दहावे वर्ष आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक वैद्य वैशाली बलवंडे यांनी केले. या रक्तदान शिबीरासाठी आयुर्वेद व्यासपीठ, धाराशिवच्या अध्यक्षा वैद्य पल्लवी कोथळकर, आयुर्वेद व्यासपीठ देवगिरी विभागाचे अध्यक्ष वैद्य प्रशांत कोथळकर, वैद्य गजानन कुलकर्णी, वैद्य राजेश पवार, सचिव वैद्य शतानंद दहिटणकर, वैद्य अविनाश नागणे, वैद्य अमित इंदापूरकर, रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 चे प्रांतपाल रविंद्र साळुंके, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांनी पुढाकार घेतला.धाराशिव येथील सह्याद्री ब्लॅड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.


 
Top