तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळ तिर्थकुंडातील पविञ जलाचे ञिपुरारा पोर्णिमा राञी दिवे लावुन जलपुजन करण्यात आले. ञिपुरारी पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीकल्लोळ पुजन करण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी राञी आठ वाजता श्रीकल्लोळ तिर्थकुंडात कडब्याच्या पेंढ्याचा ताटवा करुन त्यावर तेलाचे दिवे लावुन प्रथमता श्री कल्लोळ तिर्थकुंडातील गोमुखातुन पडणाऱ्या 108 नद्यांतील संगमाचा जलाचे पुजन करण्यात आले.

श्रीकल्लोळ तिर्थकुंड पाण्यात कडब्याचा ताटवा ठेवुन त्यावर तेलाचे दिवे लावुन श्री कल्लोळ जलपुजन धार्मिक व्यवस्थापक तथा वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, विश्वास कदम, मार्तंड दिक्षीत, संकेत वाघे यांनी केले. या विधीचे पौराहित्य बंडु पाठक यांनी केले. यावेळी स्वछता विभागाचे अण्णासाहेब पलंगेसह कर्मचारी उपस्थितीत होते. ञिपुरारी (बसवण्णे) निमित्ताने शेकडो कुमारीकांनी डोक्याला मंडवळे बांधुन महादेव पिंडीचे पुजन करुन नैवध दाखवून श्रीतुळजाभवानी मंदिरात जावुन देवीदर्शन घेतले.


 
Top