तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील लातुर रस्त्यावर असणाऱ्या पाचुंदा तलावात सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मृतदेह आडळला. सदरील मृतदेह अवशेष येथील दोन महिन्यापुर्वी घरातुन निघुन गेलेल्या 46 वर्षिय महिलेचा मृतदेह असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सदरील महिलेची ओळख पाँलीस्टर साडी व गळ्यातील सोन्याचा मण्यांच्या संखेवरुन पोलिसांनी ओळख पटवुन शरीराच्या सापळा रुपातील अवशेष डीएनऐ साठी पाठवले आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशीकी, शहरातील अनिता बाळासाहेब इंगळे 46 यांचे पती दोन वर्षापुर्वी मयत झाले होते. 2 आँक्टोबर 2023 रोजी घरातुन निघुन गेल्याने त्याची फिर्याद तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी शोधाशोध घेतला पण त्याचा पत्ता लागला नाही. अखेर रविवारी सकाळी 11.30वा पाचुंदा तलावातील सांडव्या जवळ साडी सापडली असता पोलिसांना शेतकऱ्याचा गड्याने माहिती देताच सपोनी मारुती मुंढे, पोहेका गुरुनाथ लोंखडे, संतोष करवर, आनंद सांळुके, महिला पोहेका निशा शिकारे यांनी घटना स्थळी धाव घेतली. तिथे साडी सापळा अवशेष, गळ्यातील सोन्याचे मणी ताब्यात घेवुन फाँरेसिंक टीम ने पाहणी केली. सदरील अवशेष डीएनऐ साठी पाठवण्यात आले आहे. सदरील मृतदेह दोन महिन्यात तळ्यात होता. त्यामुळे हा माशांनी खाल्ला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अंगावर असणारी साडी व गळ्यातील सोन्याच्या मण्याच्या संखेवरुन मृतदेह अनिता बाळासाहेब इंगळे यांचा असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.