धाराशिव (प्रतिनिधी)- आविष्कार - 2024 इंटर यूनिवर्सिटी झोनल लेवल प्रकल्प सादरीकरण, ग्रामीण इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज विष्णुपुरी नांदेड इथे आयोजित करण्यात आले होते.तेरणा महाविद्यालयात मागील चार वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव दिला जात असून विद्यार्थ्यांनी नांदेड येथे अविष्कार- 2024 या उपक्रमांतर्गत 12 नवीन प्रकल्प सादर केले.
यामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थी प्रदीप कबुतरे (कॅटेगरी - इंजिनिअरिंग टेक्नॉलजी) व आदित्य टेकाळे (कॅटेगरी - प्युवर सायन्स) यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून; विद्यार्थी जगदीश सुतार (कॅटेगरी - ह्यूमैनिटीज, लैंग्वेज फाइन आर्ट) व विद्यार्थीनी घोडके ऋतुजा (कॅटेगरी - ऍग्रीकल्चर ऍनिमल हजबंडरी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तरी या चार विद्यार्थ्यांची पुढील यूनिवर्सिटी लेवल साठी निवड झाली आहे. महाविद्यालयात करत असलेला रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभाग या चार प्रोजेक्टसाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करून त्या प्रोजेक्टची रूपांतर स्टार्टअप मध्ये करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.
या महाविद्यालयात मागील काळातही मानवी रोबोट, इलेक्ट्रिकल कार, इलेक्ट्रिकल स्कूटर, स्टुडन्ट अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम युजिंग आर एफ आय डी टेक्नॉलॉजी व लोकेशन बेस्ड वर्क ट्रॅक प्रणाली अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार केले आहेत. अविष्कार 2024 चे समन्वयक डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही.एस.बोंदर, प्रा.आर. बी. ननवरे या सर्वांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील व ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.