वाशी (प्रतिनिधी)- अजिंक्य क्रीडा मंडळ वाशी संचलित, अजिंक्य विद्यामंदिर वाशी शाळेत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न. शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी मराठवाडा ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष व. ग. सूर्यवंशी व प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशीचे माजी प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे सर हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष सदाशिव जगताप, एस एल पवार सर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

यावेळी कु. पृथ्वीराज श्रीमंत चव्हाण NEET प्रवेश परीक्षा पात्र, कु. प्राजक्ता कैलास बावधनकर इयत्ता दहावी प्रथम क्रमांक, कु. दिग्विजय दत्तात्रय कवडे व कु. यश विलास मोळवणे सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा पात्र व कृष्णा रामहरी कवडे नवोदय प्रवेश परीक्षा पात्र या विद्यार्थ्यांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक एस. एल. पवार सर यांनी व अहवाल वाचन मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जगदाळे सर यांनी सद्य परिस्थितीतील शिक्षणासमोरील आव्हाने यावर भाष्य केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यवंशी सर यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी ढेपे व पल्लवी क्षीरसागर यांनी केले व श्रीमती स्वाती शिंदे यांनी उपस्थितांचे आमचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


 
Top