तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदू धर्मियाचा सर्वात मोठा सण म्हणजे दिपावली उत्सव, या उत्सवाची तयारी घरोघरी जोरदार सुरु असुन सध्या गोडधोड फराळी पदार्थ तयार करण्यासाठी गृहणीची साहित्य आणण्यापासुन ते बनविणे साठी लगबग सुरु आहे.दिपावली सणात गोडधोड फराळ पदार्थ हा प्रमुख असा भाग असतो .शहरी भागात मिठाई दुकानातुन गोडधोड फराळ विकत आणुन दिवाळी साजरी केली जात असली तरी ग्रामीण भागात आजही गोडधोड फराळ पदार्थ घरीच बनवणे प्रथा परंपरा टिकुन आहे घरगुती बनवलेल्या फराळ पदार्थाला जी चव लाभते ती चव बाहेरुन आणलेल्या फराळ पदार्थाला नसते अशी भावना आजही ग्रामीण भागात असल्याने सध्या विविध प्रकारचे लाडू चिवडा चकल्या करंज्या अनारसे या पारंपरिक पदार्थासह अनेक फराळ पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे चुरमुरे पासुन ते विविध वस्तु साहित्य खरेदी साठी किराणा दुकांनान मध्ये मोठी गर्दी होत आहे मोठमोठे व्यापारी साहित्य यादी चिठ्या मागवुन घेवुन ग्राहकांना घरी माल पोहचवत आहेत.
कृषी संस्कृतीमध्ये आहार आणि सण यांचे एकसमीकरण आहे. आपल्याकडे सणांनुसार आहारामधील विविधता आढळते. दिवाळी सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल असते. पूर्वीच्या काळी आपल्या आहारात गोड पदार्थांची संख्या अत्यल्प होती. दिवाळी सणात लाडूंचे विविध प्रकार, करंजी, बालूशाही, अनारस अशा गोड पदार्थांनी तोंड'गोड' करत हा सण साजरा केला जातो. दिवाळीतील गोड पदार्थ या सणांचा आनंद द्विगुणीत करतात.परंतु, सध्या ज्या पद्धतीने बाजारात खाद्यपदार्थांना मागणी आहे त्याच पद्धतीने घरगुती तयार केलेल्या फराळीची चव चाखण्यासाठी महिलांकडून तयार केलेली आहे. फराळ विकत घेत आहेत, त्यामुळे या महिलांना या माध्यमातून रोजगारांची संधी मिळाल्याने ह्या महिलांची दिवाळी गोड होत आहे. जगात गृहिणींना दिवाळी फराळ बनवायला वेळ मिळत नाही.त्यामुळे दिवाळीचा फराळ हा बाजारात तयार स्वरूपात उपलब्ध आहे. या तयार फराळ खरेदीला गृहिणींची पसंती दिसून येते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर फराळ बनवून विकणाऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या फराळी बरोबरच बाजारात मिठाई सेलीब्रेशन, ड्रायफ्रुट सेलीब्रेशन ही विक्रीसाठी दाखल झाले आहे. अनेक नामांकित कंपण्यांचे ड्रायफ्रुट सेलीब्रेशन पॅकेजेस बाजरात नव्याने उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडेकच्या मालाच्या किमती, वाहतुकीचा खर्च वाढाला असून, यामुळे तयार 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली.