तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील महावीर लोध धर्मशाळा चे मालक रामदिन रवी सिंह व रामदिन जगदीश सिंह यांचे वडील कै. रामदिन महावीर सिंह यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. ढगे, दत्ता राठोड, अनंत मोगरकर आणि धर्म शाळेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांचे विशेष सहकार्य लाभले.


 
Top