भूम (प्रतिनिधी)-वारे वडगावची सुकन्या कु साक्षी समाधान मिसाळ 17 वर्ष वयोगटात ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सराव शिबिरासाठी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल साक्षी मिसाळ हिचा वारेवडगाव गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वारे वडगाव ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख हर्षल डिसले, उपसरपंच दत्ता नलावडे, प्रदीप नलवडे, राजेभाऊ मिसाळ, बापू सपकाळ, अंगद नलावडे, प्रशांत गोपने, अविनाश गोपने, ओंकार गोपने, राहुल तांबारे, दीपक सपकाळ, सुभाष सुपेकर, लक्ष्मण मिसाळ, महेंद्र गायकवाड, ओंकार मिसाळ, प्रफुल्ल नलवडे, सदाशिव नलावडे, त्रिंबक गोफणे, सदाशिव मिसाळ. समाधान मिसाळ, ऋषिकेश नलवडे, विलास सपकाळ. सिद्धेश्वर सुपेकर, बाबुराव सपकाळ, हरिदास वाघमारे, धारासिंग नलवडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.