तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी  मंदिरातील सीसीटीव्ही पेड दर्शन, अभिषेक दर्शन पडताळणी करावी गाभाऱ्यात चिंतामणी गेट, अभिषेक गेट या ठिकाणाहुन भाविकांना मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने याची चौकशी करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाने   जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्रीतुळजाभवानी  मंदिर संस्थान यांच्याकडे निवेदनाद्वररे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीतुळजाभवानी मंदिरात पासेस तपासणी होत नसल्याने मंदिरात बोगस पुजारी प्रवेश करीत   आहेत. पुजाऱ्यांना मंदिर संस्थानाने ओळखपत्र दिले आहे. त्याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे बोगस पुजारी प्रवेश करीत आहेत. सुरक्षा कर्मचारी कुठलीही तपासणी करीत नाहीत. या पार्श्वभूमीवर दररोज सीसीटीव्ही सातत्याने तपासावे व दोषीवर कारवाई मंदिर प्रशासनाने स्वताहुन  करावी. पेड पास व अभिषेक पासवर संबंधीत भक्तांचे नाव, आधारकार्ड, पत्ता याच्या नोंदी असतात. याची तपासणी होत नाही भाविकांना प्रवेश दिला जातो. हे ठराविक लोकांच्या आदेशावरुन हे काम करीत आहेत. याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल असण्याची शक्यता आहे. यामध्ये मंदिर संस्थानचे कर्मचारी, कंपनीचे कर्मचारी हात असावा असे आम्हाला वाटते. हे निवेदन विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी, आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त तहसीलदार यांना माहितीस्तव सादर केले आहे.


 
Top