तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील आलियाबाद येथे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी सामाजिक बांधीलकी नात्याने दिपावली पाडवा निमित्त गावातील माता भगिनींना साडीचोळी व फराळाचे वाटप करुन त्यांना दिवाळी साजरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सदरील उपक्रम बाबतीत बोलताना चव्हाण म्हणाले की एक सामाजिक बांधिलकी व आपण समाजच काही तरी देण लागतो या उद्देशाने समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचुन त्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे मत प्रकाश चव्हाण यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

यावेळी  महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चंचलादेवी मोतीराम चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, माजी सरपंच ज्योतीका चव्हाण, रेखा चव्हाण,आशा व्यंकट चव्हाण ग्रामपंचायत सदस्या शांताबाई राठोड, कांताबाई पवार, कमळाबाई राठोड, चांगुणाबाई जाधव,शानुबाई पवार, निर्मला राठोड, शांताबाई चव्हाण, राजश्री चव्हाण,शांता राठोड, पारुबाई चव्हाण, शानुबाई चव्हाण,रेश्मा चव्हाण, शानुबाई राठोड,शानु राठोड,चावळाबाई राठोड, मोताबाई चव्हाण,धानाबाई राठोड,मंगल चव्हाण, ललिता राठोड,काजल राठोड, वर्षा राठोड, सुनिता चव्हाण,इंदू चव्हाण, यांच्या सह गावातील बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top