तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा तुळजापूर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बोरी धरणाच पाणी साठ्यात वाढ न झाल्याने सोमवार नंतर तिर्थक्षेञ तुळजापूर ला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक व मुख्याधिकारी यांनी प्रासिध्द पञक काढुन दिली. या निर्णयामुळे शहरवासियांसह भाविकांना हिवाळा पासुनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर ला नळदुर्ग स्थित बोरी धरणातुन पाणीपुरवठा होतो 2022 साली म्हणजे मागील वर्ष हे धरण पुर्ण क्षमतेने भरले होते तेव्हा 32 दशलघमीटर पाणीसाठा झाला होतामाञ 2023 मध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या 9 दशलघमीटर पाणी साठा असुन यातील 1.5 दशलघमीटर टक्के पाणीसाठा मृत आहे. 4 दशलघमीटर बाष्पीभवन होणार असुन 4.5 दशलघमीटर पाणी मिळणार आहे. यातुन तिर्थक्षेञ तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर व इतर खड्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. तुळजापूर तालुक्यात व तुळजापूर शहरात कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरी धरणात/कुरनूर प्रकल्पात उपलब्ध पाणी 9 दलघमी इतके आहे. धाराशिव वरीलप्रमाणे उपलब्ध पाणीसाठा हा जून-2024 पर्यत जपून वापरणे आवश्यक असून त्याकरिता पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. करिता उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस वापरणे आवश्यक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून दि.20 नोव्हेंबर 2023 रोजी शहरातील मंगळवार पेठ या भागात पाणीपुरवठा होणार आहे. त्या दिवसापासून म्हणजे दि. 20 नोव्हेंबर 2023 नंतर दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवार पेठ या भागात दि.23 नोव्हेंबर 2023 रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल व त्यानंतर संपूर्ण शहरात जुन्या पद्धतीने फक्त एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी प्रशासनामार्फत आव्हान करण्यात येते की, उपलब्ध पाणी साठा जून-2024 पर्यत पुरविणे करिता या पुढील कालावधीत शहरामध्ये एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी उपलब्ध पाणी जपून वापरून आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.