तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ दीपावली सुट्यांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दि.18 ते 21 नोव्हेबर 2023 या चार दिवसात मंदिर पहाटे एक वाजता धर्मदर्शनार्थ खुले केले जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
दिपावली सुट्टी निमित्त होणारी गर्दी शनिवार दि. 18 ते मंगळवार दि. 22 नोव्हेंबर पाहता या चार दिवसाच्या कालावधीत सकाळचे चरणतीर्थ पहाटे 1.00 वाजता होईल. तसेच दि. 22 नोव्हेंबर 2023 पासून दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणारे मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1.00 वाजता होऊन पुजेची घाट सकाळी 06.00 वा होईल. तसेच अभिषेक सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 वाजता या वेळेत संपन्न होतील. तसेच अभिषेक कालावधीत देणगीदर्शन बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे.