धाराशिव (प्रतिनिधी)-येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी डॉ.संगीता बावस्कर यांचा सत्कार करण्यात आला. कुमारी डॉ. संगीता बावस्कर या मातंग समाजातील असून शिक्षण क्षेत्रातील ग्रंथालय विषयातून पीएच.डी पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. याबद्दल त्यांचा धाराशिव येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे चौकात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी पदवी प्राप्त करून त्यांनी मातंग समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. यापुढेही असेच कार्य आपल्या हातून व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या सत्कार बद्दल कुमारी डॉ .संगीता बावस्कर यांनी आभार व्यक्त केले आहे . मला पीएच.डी मिळाल्याचा आनंद त्याच वेळी होईल ज्यावेळी माझ्यासारख्या अनेक मुली मातंग समाजातून पीएच .डी प्राप्त करतील असे त्या यावेळी म्हणाल्या.याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ता प्रा. डॉ. मारुती लोंढे, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, नगरसेवक सोमनाथ गुरव,विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अजय पेठे, ॲडफ दिलीप पेठे, धाराशिव पूर्व जिल्हाध्यक्ष वंदनाताई डोलारे उपस्थित होते.


 
Top