तेर (प्रतिनिधी) - उपलब्धता व गरज यातून वस्तूंच्या देवघेवीचा व्यापार खूपच अडचणीचा झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे चलन व्यवहारात येण्यास सुरुवात झाली.दोन हजार वर्षांपूर्वी चलणाची एकत्रित पद्धती होती. याचा साक्षात पुरावा धाराशिव तालुक्यातील तेर येथील तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे यांच्याकडे दोन हजार वर्षांपूर्वीची 11 चांदीची व 11 सोन्याची नाणी आहेत.

दोन हजार वर्षांपूर्वी चांदीच्या धातूच्या स्वरूपातील पंच माक व आहत नावाची नाणी चलनात आली. धाराशिव तालुक्यातील तेर येथील तगर अभ्यासक्र रेवणसिद्ध लामतुरे  यांच्याकडे खाजगी संग्रहात अकरा चांदीची नाणी यापैकी काही नाणी पाच चिन्ह असलेली आहेत व सहा नाणी यापासून 11 चिन्हांकित आहेत.तक सुसंगत अभ्यासानुसार पाच राजे किंवा पेढया एकत्र येऊन त्यांनी एक व्यवस्था व नियम तयार केले.ते चलन पाच राज्यांमध्ये वापरले गेले.या सोयीमुळे आणखी सहा राजे अथवा पेढया या चलणी नाण्याच्या योजनेमध्ये सहभागी होऊन त्यांनी ते चलन व्यवहारात आणण्यास सुरुवात केली.याचिच अर्थ सध्या युरोपियन राष्ट्रांमधील कॉमन चलन(युरो)

ही संकल्पना भारतात दोन हजार वर्षांपूर्वी वापरली जात होती.नाशिक येथील पांडवलेणीमध्ये वीस भिक्षूंच्या वस्त्र प्रावरणासाठी त्यांना दर महा 12 कार्षापन मिळावेत म्हणून दोन कार्षापनाची एकूण रक्कम दर महा दर शेकडा एक टक्का व्याजाने गुंतवल्याचा उल्लेख आहे.त्याच बरोबर अनेक पेढ्या मध्ये ठेव ,देवघेव व कर्ज देण्याघेण्याचा व्यवसाय चालू होता.असे अनेक लिखीत उल्लेख आहेत.याचाच अर्थ त्यावेळेस बँकींग सिस्टीम होती.12 टक्के व्याजदर मुदत ठेव होती.हे सिद्ध होते.या चांदीच्या प्रत्येक नाण्याच्या आकारावरून त्या वेळेस त्या नाण्याची प्रचलित किंमत निश्चित होत असे.विजयनगरचा राजा रामदेव यांची 11 सुवर्णाची नाणीही तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे यांच्याकडे आहेत.या नाण्यांचा दर्शनी भागावर शिव, शिव-पार्वती, विष्णू लक्ष्मी, दोन तोंडाचा गरूड असे ठसे आहेत.त्या चिन्हावरून त्याची किंमत ठरत होती.या नाण्याच्या मागील बाजूस राजा-रामदेव-राय हे नाव निर्माण केलेले आहे.जागतिट बँकेच्या कल्पनेतून व पुढाकारातून तसेच   यांनी प्रसिद्ध केलेल्या चाटवरून इ.स.0 ते इ.स.2003 पर्यंतच्या जागतिक जीडीपी चार अभ्यास केला.यावरून इ.ज्स.1 मध्ये भारतीय जीडीपी 32 टक्के,चिन 25 टक्के,युरोप 13 टक्के,मध्य पूर्व 12 टक्के, अमेरिका 0 टक्के होता हे सिद्ध होते.तसेच तसेच त्यांच्याच अभ्यासानुसार एकूण जागतिक संपत्ती मध्ये भारत 38 टक्के, चीन 32 टक्के, इतर संपूर्ण जग 30 टक्के हे प्रमाण होते.त्याकाळी भारतातून 40पेक्षा जास्त वस्तूची निर्यात होत होती.व 15 पेक्षा कमी वस्तूची आयात होत होती.इ.स.150 च्या आसपास भारतामध्ये आलेल्या प्लइनई या जगप्रवाश्याच्या पुस्तकामध्ये भारतात 2000 पूर्वी दर वर्षी 10 लक्ष पौंडाची संपत्ती येत असल्याचा उल्लेख आहे.याचाच अर्थ भारत ही सोनेकी चिडीया हे किंवा भारतातून सोन्याचा धूर येत होता हे वाक्य रूढ झालेले दिसतात.त्यांच्या चार्टच्या संदर्भानुसार इ.स.1750 मध्ये 20 टक्के,ई.स.1900 मध्ये 10 टक्के,1970 मध्ये 2.5 टक्के या पद्धतीने जीडीपी कमी कमी होत गेला.

(आमच्या खाजगी संग्रहातील सोन्या व  चांदीच्या नाण्यावरून  इ.स.0 या काळात भारतातून सोन्याचा धूर निघत होता.श्री रेवणसिद्ध लामतुरे,तगर अभ्यासक, तेर).


 
Top