तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील बस स्थानकामध्ये मुक्कामी असलेल्या दोन बसच्या अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली.

सोमवार दि.6 नोव्हेबर रोजी रात्री तेर येथील बसस्थानकात कळंब आगाराच्या तेर - माजलगाव बस क्रमांक एम.एच.20/बी.एल 0655 व धाराशिव आगाराची तेर -धाराशिव बस क्रमांक एम.एच.40 9803 या दोन बस मुक्कामास होत्या. रात्रीच्या सुमारास या दोन्ही बसच्या अज्ञात व्यक्तीने काचा फोडल्या आल्याची घटना घडली असून याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास गवळी करीत आहेत.


 
Top