भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाडोंग्री गावातील सरपंचपद रिक्त असल्याने या ठिकाणी निवडणूक अधिकारी व्ही.बी.कोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यात उल्का सत्यवान मगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर वालवड येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रभावती जनार्धन देवळकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

हाडोंग्री येथील निवडी वेळी ग्रामसेवक नीलम जानराव, बीट अंमलदार ए. ए. कवडे, माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताप्पा तळेकर, बाळासाहेब मुळे, रवींद्र लोमटे, संदीप मगर, सुखदेव पालकर भरत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर शिरसागर अजय सुतार, लिंबाबाई लोमटे ,उपसरपंच कौशल्या क्षीरसागर, प्रशांत कदम यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूम तालुक्यात मोठी समजली जाणारी वालवडची ग्रामपंचायत असून सदस्य संख्या 11 आहे. 2021 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 11 सदस्य निवडून आले होते. सदस्यात ठरलेल्या समझोत्याप्रमाणे पदाची अडीच-अडीच वर्षे ठरली होती. त्याप्रमाणे अडीचवर्षे झाल्यानंतर तत्कालीन सरपंच शारदा देवळकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभावती जनार्धन देवळकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अध्यासी अधिकारी ए. डी. महामुनी यांनी काम पाहिले. तर ग्रामसेवक मेघराज गायकवाड यांनी त्यांना मदत केली. यावेळी उपसरपंच कृष्णा मोहिते, गटनेते प्रवीण खटाळ, माजी जि.प.सदस्या लताताई विभुते, जनसेवा बँकेचे व्हाइस चेअरमन जालिंदर मोहिते, माजी उपसरपंच माणिक माळी, माजी सरपंच जयलानी शेख, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर सावंत, आश्रू लोखंडे, सुकुमार यादव, कमल मोहिते, शारदा देवळकर, बीबी पठाण,निता पाटोळे आदीसह ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक व कार्यकत र्ेमोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top