भूम (प्रतिनिधी)-भूम येथील एसटी स्टँड मधून दररोज भूम ते गणपतीपुळे ही नवीन बस आज पासून सुरू होत आहे. ही बस तित्रज, आनाळा, कुर्डूवाडी, पंढरपूर कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे अशी धावणार आहे.
ही बस सकाळी भूम मधून साडेसात वाजता निघेल. तर गणपतीपुळे येथून संध्याकाळी साडेसात वाजता भूमकडे येईल. तिंत्रज, दांडेगाव, वाटेफळ, देवगाव येथील नागरिकांची गणपतीपुळे येथे लाल दगडाच्या खाण्यामध्ये काम करण्यासाठी ये-जा होते. त्यामुळे येथील नागरिकांनी भूम येथील अगार प्रमुख महेश लांडगे यांना गाडी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे भूम मधून दररोज भूम-गणपतीपुळे हे एसटी धावणार आहे.