धाराशिव (प्रतिनिधी)-शेतक-यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हयात रेशीम उद्योगाचा प्रचार प्रसारासाठी जिल्हयात रेशीम प्रचार रथ फिरणार आहे.महारेशीम अभियान 2024 करिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज 22 नोव्हेंबर रोजी रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवुन महारेशीम अभियानाचा शुभारंभ केला.यावेळी उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हयातील सर्व तालुका कृषी अधिकारी अधिकारी,रेशीम विकास अधिकारी एस.बी.वराट,मनोज पेटकर,क्षेत्र सहायक रेशीम बी.एन.सुर्यवंशी,एस.एच.सुर्यवंशी, एन.ए.पवार तसेच जिल्हयातील सर्व मनरेगा सहायक कार्यक्रम अधिकारी, रेशीम तांत्रीक सहायक प्रताप घुटे, प्रविण गडदे,संदीप पवार,ओंकार राऊत,रेशीम प्रगतशील शेतकरी प्रदिप किरमे,बाबा कुंभारकर,सुभाष कुटे,चॉकीधारक आबासाहेब पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी अल्प पाण्यावर रेशीम शेतीतुन साधारणत: दीड ते दोन लक्ष रुपयांचे उत्पादन वर्षभरात घेणे सहज शक्य असल्याचे ते म्हणाले. जिल्हयाचे पर्जन्यमान लक्षात घेता जास्तीत जास्त शेतक-यांनी रेशीम अभियान कालावधीत तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हयातील शेतक-यांना 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत करण्याचे केले. यावर्षी रेशीम अभियान हे रेशीम विभाग,कृषी विभाग व पंचायत विभाग संयुक्तरित्या राबविण्यात आहे. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ठ असल्याने रेशीम शेतीकरिता 3 लक्ष 97 हजार रुपये 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. महारेशीम अभियान 2024 चा शुभारंभ झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी रेशीम विभाग,कृषी विभागाची बैठक घेवुन रेशीम शेती करण्यासाठी शेतकरी नोंदणी या अभियानादरम्यान करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.