तुळजापूर (प्रतिनिधी)- दिपावली पाडव्या दिनी अनावश्यक खर्च रुढी परंपरेला फाटा देत मुलगी पाहण्यास आलेल्या मंडळीना मुलगी पसंत पडताच जमलेल्या मंडळीनी तात्काळ लग्न करण्याचे सुचवुन गोरज मुहुर्तावर लग्न लावुन दीपावली पाडव्या दिनी नवीन सुन लक्ष्मी रुपात आणल्याची घटना मंगळवार दि.14 नोव्हेंबर रोजी आरळीखुर्द येथे घडली. मराठा समाजात रुन काढुन लग्न भव्यदिव्य करण्याची परंपरा असुन माञ या परंपरेला फाटा देण्याचा निर्णय मराठा समजातील नेत्यांनी घेवुन तो अमलात आणुन ग्रामीण भागात ऐक चांगली परंपरा चालु केली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, मंगरूळ ता तुळजापूर येथील शिंदे कुटुंबातील सदस्य व त्यांचे पाहुणे हे मुलगी पहायला व लग्न जमवायला आरळी ( खु) येथे पारवे यांच्या घरी आले. मंगरूळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री सुदर्शन शिंदे हे त्यांचे चिरंजीव श्रीशैल शिंदे याला मुलगी पाहण्यासाठी आरळी येथे श्री अभिमन्यू पारवे यांची मुलगी कु वैष्णवी हिला पाहण्यासाठी दिपावलीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून आले. मुलगी पहिली पसंत ही झाली. लगेच बैठक ही झाली.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांनी लगेच दोन्ही कडील पाहुणे बोलाविले व लगेच आपण अक्षता टाकून घेवू व सून घेऊन जावू असे सुचविले. याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, सरपंच महेश डोंगरे, आरळी गावचे सरपंच किरण दादा व्हरकट, तेथील तंटामुक्ति अधक्ष बाजीराव जाधव या सर्वांनी प्रस्तावाला होकार दिला. लगेच लग्न घाई सुरू झाली. गोरज महूर्तावर अक्षता ही टाकली व संध्याकाळी शिंदे परिवार आपली नवी नवेली सूनबाई घेवून मंगरूळला आले. या प्रसंगी इंदिरा परिवार मंगरूळचे सर्व शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी ही उपस्थित होते. दोन्ही गावातील दोन्ही कडील पाहुणे मंडळी ही फोन संदेशाच्या आधारे उपस्थित राहून वधू वराना शुभ आशिर्वाद दिले. दोघाही कुटुंबांनी हा चांगला निर्णय घेतला. सर्व आर्थिक खर्चाला अळा घालून चांगले कार्य पार पाडले याबद्दल दोन्ही परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व यापुढे सर्वांनी हीच परंपरा चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.