तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पोर्णिमा नंतर आलेल्या बुधवारी  दि1रोजी दुपारी दोन वाजता जगदाळे काँम्पलेक्स हाँटेल कामत जवळ एका साठ वर्षिय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन तो देविदर्शनार्थ आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सदरील इसम रंगाने, उंची पाच फुट, सडपातळ बांधा आहे. इसमाचा अगांवरील शर्टावर देविचा कुंकवाचे हाताचे छापे मारलेले असल्याने सदरील इसम देवीदर्शनार्थ आला असण्याची शक्यता आहे. तरी सदरील इसमाबाबतीत कुणाला माहिती मिळाल्यास पोनि. गजानन घाडगे, पोहे. जी. डी. लोंखडे किंवा 9421354450 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस ठाणे तुळजापूर यांनी केले आहे.


 
Top