उमरगा (प्रतिनिधी)-संविधान दिनी नवविवाहित जोडप्यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून गृहस्थी जीवनात पदार्पण केले.दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट कपिलवस्तू बुद्ध विहार कराळी येथे रविवारी (दि.26) भीमनगर येथील रहिवासी फुलचंद इंद्रजित कांबळे यांच्या मुलीचा मंगल परिणयाचा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वधूवरांनी जाहीर वाचन केले.
कार्यक्रमास बहुजन विकास संघर्ष समितीचे कमलाकर सुर्यवंशी,बौद्धांचार्य मिलिंद डोईबळे,धम्ममित्र गोळाप्पा कांबळे,ट्रस्टचे उपाध्यक्ष एम. एस.सरपे,ट्रस्टचे विश्वस्त अभियंता संजय सरपे,प्राचार्य डॉ.विजय सरपे,रिपाइंचे एस.के.कांबळे (चेले)माजी नगरसेवक सतीश सुरवसे,अतिक मुन्शी,अडँ हिराजी पांढरे,अडँ सुधाकर दामावले,संविधान विचार मंचचें अध्यक्ष अशोक बनसोंडे,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संतोष सुरवसे,नो चॅलेंज सामाजिक संस्थेचे विजय वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते श्रीधर सरपे,नववधू सोनिया, वर सतीश, मीना फुलचंद कांबळे,अनुसया विठ्ठल सुर्यवंशी आदींनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधानाची शपथ घेतली.देशभर संविधान दिन उत्साहात साजरा केला जातो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान घरा घरात पोंहोचवून संविधानाचा जागर व्हावा या हेतूने मंगल परिणयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास शाक्यदीप कांबळे,अजय सरपे,सतीश कांबळे,महादेव सोनकांबळे, दत्ता गटकांबळे,मल्हारी सुर्यवंशी,आनंत कांबळे,राजा सुर्यवंशी,विश्वास सोनकांबळे,जीवन सरपे,बाबा मस्के, अभिमन्यू भोसले,मिलींद सुर्यवंशी, सहदेव सोनकांबळे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधानाने व्यक्तींचे स्वातंत्र्य,समता, बंधुता,आणि न्याय या महान मूल्याची देणगी दिली आहे. भारतीयांना सामाजिक,आर्थिक राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ती, विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणारी महान घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे.सविंधानीक अधिकाराचे जतन करण्यासाठी प्रत्येकांनी प्राण पणाने प्रयत्न करावेत. संविधान दिनी नवं विवाहित जोडप्याने संविधानाची शपथ घेतली आणि संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले या वेळी प्रास्ताविका सोबत वधू सोनिया वर सगीश, बौद्धांचार्य मिलिंद डोईबळे, धम्ममित्र जी. एल.कांबळे व उपस्थित महिलांनी शपथ घेतली.