तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यपालाच्या सुचनेचा अनादर करून मंदिर विश्वस्ताकडुन दि.4/7/2017 रोजी घेण्यात आलेला ठराव कं. 4 पेड (पास) दर्शन ठराव रद्द बातल करूण विधी व न्याय विभागाच्या सुचने नुसार समान दर्शन व्यवस्था सुरू करून सामान्य भक्तांवर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवावा अशी मागणी जनहित संघटनेने तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन यांना देवुन केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे कि विधी व न्याय विभागाने स्वतंत्र दर्शन व्यवस्था केल्याने तासोन तास रांगेत उभे राहणाऱ्या सामान्य भावीक भक्तांवर अन्याय होत आहे. अशा सुचना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल याच्या कमाका संकिर्ण 2010/ 35/ (प्र.क्र.85)/ का. सोळा मंत्रालय मुंबई 400 032 दिनांक 07 सप्टेंबर 2010च्या सुचनेचे पालन करणे गरजेचे असताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्ताकडुन दि.4/7/2017 रोजी ठराव क्र.4 घेऊन पिचर थियटर, तमाशा थिएटर प्रमाणे पेड (पास) दर्शन सुरू केल्याने विनामुल्य धर्मदर्शन 25 फुटा वरून, पेड दर्शन 200 रूपये 10 फुट, 500 रूपये पेड दर्शन आणखी जवळ परंतु देवीच्या दरबारात हा दुजाभाव करूण सामान्य भाविक भक्ताचा विचार न करता निव्वळ मंदिराचे बाजारीकरण केले आहे.
तसेच अन्य धर्मामध्ये (गुरुव्दार, मज्जिद, चर्च,) शुल्क आकारूण दर्शन नाही परंतु आपल्याच हिंदु धर्मात गैर पायंडा का पाडत आहोत. त्यामुळे सामान्य भाविकांमध्ये तिव्र नाराजी निर्माण होत असल्याने मंदिराचे पावित्र नष्ट होत आहे. तरी तुळजाभवानी देवी समोर सर्व भावीक भक्त (लेकर) समान असल्याने विश्वस्ताच्या बाजारीकरण धोरणामुळे हा गैर प्रकार सुरू असुन पेड दर्शन संबधी मंदिर विश्वस्ताकडुन सन 2017 मध्ये घेतलेला ठराव क्र .4 तात्काळ रद्द बातलचा ठराव घेण्या संदर्भात व विधी व न्याय विभागाच्या सुचनेचे पालन करण्यासंदर्भात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सर्व विश्वस्ताना सुचित करावे
अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असे अजित सांळुके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.