तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावचे सुपुत्र सर्जेराव गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्याचा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील व संपर्कप्रमुख नंदू राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्जेराव गायकवाड व त्यांच्या सहकार्याचे तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत तुळजापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांनी केले.