तुळजापूर (प्रतिनिधी)- 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन निमित्त जनसेवक अमोल कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते विशाल रोचकरी, न. प.प्रा.शाळा क्र.2 चे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा नेते महेश रेणके, महेंद्र पाटील, सुरजमल शेटे,औदुंबर कदम उपस्थित होते. प्रथम रक्तदाते रक्तदान करणाऱ्या निलेश जैस्वाल यांचा सत्कार संयोजक जनसेवक अमोल कुतवळ यांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान शिबिरास ग्राम विकास विभाग मंत्रालयच्या सचिव डॉ. उर्मिला जोशी व त्यांचे पती वैभव जोशी, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष धीरज पाटील, युवा नेते निलेश रोचकरी, ॲड. रामचंद्र ढवळे, आनंद मालक, जगताप, छोटू पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन संयोजक जनसेवक अमोल कुतवळ यांच्या कार्याचे कौतुक केले. रक्तदान शिबिरात सहभागी सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आळजापूरचे सरपंच शांतीलाल घुगे, विकी घुगे, प्रकाश मगर, शहाजी कावरे, नवनाथ जगताप, विजय मामा शिंदे उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे सह अण्णा गुंडगिरी, जफर शेख, गणेश अमृतराव, विकास चव्हाण, बिरू माने, देविदास पवार, युवराज पवार, श्रेयस कुतवळ, बाळासाहेब धनके, पप्पू कांबळे, अजय धनके, संतोष पवार, सलमान शेख, नागा शेंबडे, हनुमंत कांबळे, पप्पू शेख, गुलजार खान यांनी परिश्रम घेतले.