धाराशिव (प्रतिनिधी)- येणाऱ्या काळामध्ये सर्वसामांन्य शेतकरी, कष्टकरी विद्यार्थी, युवक, महिला सुरक्षा, राज्यामध्ये चालु असलेला मराठा, धनगर, मुस्लिम बांधवांचा आरक्षणाचा लढा, पाणीटंचाई या प्रमुख मागण्यावरती काम करुन प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणार आहे. त्यासाठी या पदाचा वापर करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नुतन जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी केले.

धाराशिव (प्रतिनिधी)- येणाऱ्या काळामध्ये सर्वसामांन्य शेतकरी, कष्टकरी विद्यार्थी, युवक, महिला सुरक्षा, राज्यामध्ये चालु असलेला मराठा, धनगर, मुस्लिम बांधवांचा आरक्षणाचा लढा, पाणीटंचाई या प्रमुख मागण्यावरती काम करुन प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणार आहे. त्यासाठी या पदाचा वापर करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नुतन जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धाराशिव जिल्हा आढावा बैठक धाराशिव संपर्क कार्यालय येथे पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय दुधगावकर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना दुधगावकर म्हणाले की, जिल्हाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लवकरात लवकर नियुक्त्या करून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल, असे अश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनिषाताई राकुंडे पाटील, सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, उद्योग व्यापार विभागाचे प्रदेश सचिव जगदीश सुरवसे, संजय निंबाळकर यांची भाषने झाली.

 या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईजचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा. चेअरमन मधुकर मोटे, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, परंडा तालुकाध्यक्ष संदीप पाटील, भुम तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, वाशी तालुकाध्यक्ष दिलीप घोलप, युवती जिल्हाध्यक्षा श्वेता दुरुगकर, शहराध्यक्ष अय्याज शेख, ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब अडसुळ, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदिप डोके, जिल्हा उपाध्यक्ष हबीब खान पठाण, सतीश एकंडे, सुरेश टेकाळे, नानासाहेब जमदाडे, रमेश देशमुख, संतोष पवार, शिवाजी सावंत, औदुंबर धोमडे, जयंतराव देशमुख, उत्तमराव लोमटे, प्रकाश मुंदडा, आर. डी. सुळ गुरुजी, शहाजी नन्नवरे, भाऊसाहेब पाटील, ॲड. प्रविण शिंदे, अनिल जाधव, इकबाल पटेल, बालाजी डांगे, वाजीदभाई पठाण, शशीकांत राठोड, दौलत गाडवे, बाळासाहेब सोनके, राजु डांगे, ॲड.नितीन पाटील,बालाजी तांबे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील समस्यांसाठी पाठपुरावा करुन सोडवू- राहुल मोटे

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, दुधाचे कमी होत असलेले दर, यावर्षी झालेला अत्यल्प पावसामुळे येणाऱ्या काळामध्ये भेडसावणारी पाणीटंचाई, चाराटंचाई पशुधन वाचवण्याकरिता जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने प्रयत्न करणे गरजेचं असल्याचे राहुल मोटे यांनी सांगीतले. त्यासाठी योग्य पाठपूरावा करून शासन दरबारी हे प्रश्न सोडवुन घेण्याचे आश्वासन दिले.


कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू - संजय निंबाळकर

पक्षामध्ये पडलेल्या फुटीमुळे जिल्ह्यातील अनेक पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी लवकरात लवकर नविन नियुक्त्या करून निष्ठांवंत पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी राहुल मोटे, संजय दुधगावकर यांच्यासह आपण खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन संजय निंबाळकर यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.


 
Top