धाराशिव (प्रतिनिधी)-मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी सौ. सुमित्राताई, मुलगी व बहिन भारतीताई खराडे पाटील यांनी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे येवून तुळजाभवानी मातेची पुजाअर्चा करून आरती केली. यावेळी माध्यमांशी बोलताना भारतीताई खराडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी मातेने लढण्यासाठी बळ दिले आणि यश दिले. त्याप्रमाणेच मनोज भैय्यांना तुळजाभवानीने मराठा आरक्षणासाठी लढण्यासाठी व यश मिळविण्यासाठी बळ द्यावे अशी प्रार्थना केली असल्याचे सांगितले. 

सौ. सुमित्राताई जरांगे पाटील, भारतीताई खराडे पाटील या तुळजापूरकडे येत असताना वाटेत त्यांना ठिक-ठिकाणी आडवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे सुमित्राताई जरांगे पाटील तुळजापूर येथील महिला मोर्चात सहभागी होवू शकल्या नाहीत. तुळजापूर मध्ये आल्यानंतर त्यांनी माता तुळजाभवानी मातेचे पुजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना सुमित्राताई यांनी आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून, आई तुळजाभवानीने त्यांना लढण्यासाठी बळ द्यावे अशी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे सरकारला सद्बुध्दी दे.


दोन महिने वाया घालवून नये

यावेळी जरांगे पाटील यांची कन्या हिने माध्यमांशी बोलताना सरकारने ज्याप्रमाणे 40 दिवस वाया घालविले. त्याप्रमाणे हे दोन महिने वाया घालवू नये. आई तुळजाभवानी आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही असे सांगून समाजात एकजुट ठेवावी अशी प्रार्थना आपण आई तुळजाभवानी चरणी केली आहे असे सांगितले.


 
Top