भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यामध्ये एकूण चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक लागली असून दि. 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये माणकेश्वर व गोळेगाव प्रत्येकी एक जागेसाठी बिनविरोध झाले आहे. तर माळेवाडी 2 दोन जागेसाठी तर ईराची वाडी येथे एका जागेसाठी दोन उमेदवारात निवडणूक होत आहे. 

माणकेश्वर येथील एक नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून सुजाता सतीश माळी जागा बिनविरोध. तर गोळेगाव येथील अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून सखुबाई कल्याण शिंदे या बिनविरोध निवडून आले आहेत. माळेवाडी येथे दोन जागेसाठी पाच जण रिंगणामध्ये आहेत. यामध्ये सर्वसाधारण स्त्री वर्गातून सुनंदा महादेव चव्हाण व अश्विनी केशव चव्हाण तर अनुसूचित जाती जमाती स्त्री वर्गातून हिराबाई हनुमंत आलट, पुनम जयवंत आलट, सुमन प्रकाश आलट हे आपलं नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. व्ही. शिंदे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.


 
Top