परंडा (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील कंडारी येथे उपोषण करणार्य़ा बालाजी देशमुख यांनी काल बहिणीच्या हस्ते दुध प्राशन करून उपोषण सोडले . मराठा आरक्षणासाठी कंडारी येथे सात जण अमरण उपोषणाला बसले होते .

या पैकी सहा अंदोलकांनी दुपारी तहसीलदार धनश्याम अडसुळ यांच्या विनंती ला मान देऊन उपोषण मागे घेतले होते . सातवा अंदोलक मावळा बालाजी देशमुख यांनी उपोषण सोडले नव्हते. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. असा पवित्रा घेतला होता. शेवटच्या श्वासापर्यंत मैदान सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केला होता.

दरम्यान रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात चर्चा होऊन दोन महिण्यांच्या कालावधीत आरक्षण द्यावयाचे ठरले . व जरांगे पाटलांनी उपोषण सोडले म्हणून बालाजी देशमुख यांनी ही आपल्या भगिनी च्या हस्ते दूध प्राशन करून उपोषण सोडले . गेली सहा दिवस अन्नत्याग करून अंदोलनात सहभाग घेणार्य़ा या सात ही मावळ्यांचे समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिवचरित्रकार ह.भ.प नामदेव महाराज चव्हाण यांनी कंडारी येथील उपोषण स्थळी किर्तन करून आंदोलनात सहभाग नोंदवला. मराठा आरक्षणासाठी तन मन धनाने काम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगीतले.

कंडारी अमरण उपोषणातील खिंड लढवलेले मावळे 

हौसराव देशमुख, समाधान तिंबोळे, ब्रम्हदेव तिंबोळे, नानासाहेब देशमुख, जनार्धन देशमुख, अमोल तिंबोळे, बालाजी देशमुख यांनी शर्थीने खिंड लढवली व इतर मावळ्यांनी त्यांना साथ दिली होती.मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार साखळी उपोषण सुरुच राहणार आहे.


 
Top