तुळजापूर (प्रतिनिधी)- संघर्ष योध्दा मनोज जरांगे  यांना मराठा आरक्षण मिळवुन देण्यासाठी बळ ताकद दे असे साकडे देविचरणी बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाज बांधवांनी पोत, मशाल रँली काढुन साकडे घातले. यावेळी हजारो मराठा समाज बांधव उपस्थितीत होता. 

शहरातील व तालुक्यातील समस्त सकल मराठा समाज बांधवांनी  बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी  संध्याकाळी 7 वाजता  छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात एकञित आले. हातात देविची पोत, मशाली, मेणबत्ती घेवुन एक मराठा लाख मराठा, मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. भवानी रोड मार्ग राजेशहाजी दारी येवुन देविचा पोत ओवाळुन  महाआरती करुन मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी बळ दे, ताकद दे आणि समाजाच्या मागण्या मान्य होऊ दे म्हणून साकडे घातले. या वेळी हजारो समाज बांधव यात सहभागी झाले होते.



 
Top