धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी व आ.कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांनी मुंबई येथे मंत्रालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन केल्यामुळे त्यांना जबरदस्तीने दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात गाढव कारभार सुरू असल्याचा आरोप करीत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो गाढवांच्या गळ्यात बांधून त्यास जोडे मारीत दि.2 नोव्हेंबर रोजी निषेध केला.

जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी टायर जाळून रास्ता रोको, साखळी उपोषण, आमरण उपोषण, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे राजीनामा आदी आंदोलने सुरु आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव, सोमनाथ गुरव, अमोल जाधव, बंडू आदरकर, प्रशांत साळुंके, अमित उंबरे, अभिजित देशमुख, नीलेश साळुंके, अमोल सिरसट, गजेंद्र जाधव, संकेत सुर्यवंशी, साजीद शेख, पंकज पाटील, मनोज पडवळ, सुनिल वाघ, पिंटू आंबेकर, साबेर सय्यद, नवज्योत शिंगाडे, वैभव वीर, आकाश मुंगळे, अजित बाकले, चेतन वाटवडे, अफरोज पिरजादे, अजय नाईकवाडी आदींसह इतर मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध केला. 
Top