तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत बाल संसद 2023 निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय उत्साही वातावरणात 29 आक्टोबरला संपन्न झाली. या निवडणुकीत शाळा विकास पॅनल हारले तर शाळा सुधार पॅनल जिंकले.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या संकल्पनेतून बाल संसद निवडणूक घेण्याची संकल्पना पुढे आली.पहीली ते सातवी च्या प्रत्येक वर्गातून दोन उमेदवार निवडून द्यायचे असे ठरवून बाल संसद निवडणूक घेण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .काकासाहेब मगर व उमेदवार यांनी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली व मतपेटीची पूजन करुन प्रत्यक्ष मतदान सुरू केले.यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड , संजय लोमटे, रामा कोळी अंगणवाडी कार्यकर्ती, पालक ,प्रतिष्ठीत नागरिक व शिक्षक यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया घेण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पूजा रोहीदास, अंगणवाडी कार्यकर्ती जोशिला लोमटे, .सरोजा वाघमारे यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.विजयी पॅनल घोषित करुन विजयी उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराला फूल देऊन हस्तांदोलन केले. नंतर विजयी पॅनलच्या उमेदवाराचे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी पुष्पगुच्छ देऊन, मिठाई भरवून ,गुलाल उधळून आनंद साजरा केला.बाल संसद म्हणजे जबाबदारी, नेतृत्व, निर्णय क्षमता, हक्क व जबाबदाऱ्या या सर्व बाबी बालमनावर रुजवण्यासाठी केलेला संस्कार सोहळा होय.
उमेदवार, मतदार,पॅनल, चिन्ह, प्रचारासाठी भेटीगाठी, मतदार यादी, मतपत्रिका मतदान केंद्र, मतदान कक्ष,मतपेटी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बोटाला शाई लावणे, गुप्त मतदान, मतमोजणी करणे विजयी पॅनल घोषित करणेअशा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असणाऱ्या बाबींचे नियोजन व प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थीनींना मिळाला.आपणच आपला नेता निवडणे, मतदान किती महत्त्वाचे अमूल्य आहे ,स्वतः विद्यार्थीनीनी सर्व कामात सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिल क्षिरसागर, मालोजी वाघमारे, काशीनाथ नरसाळे, प्रतिभा जोगदंड, पल्लवी पवार , ज्योती गाढवे, आशिष लोमटे, सुनिता पांचाळ व विद्यार्थीनी यांनी नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी केली. सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने लोकशाहीची सुरुवात बालमनावर कोरली गेली.
बाल संसद निवडणूकीत दोन पॅनल निवडणुकीत उभारले होते.एकूण 177 मतदानापैकी शाळा विकास पराभूत पॅनलला 26 मते पडली या पॅनलचे चिन्ह पुस्तक होते तर शाळा सुधार विजयी पॅनलला 58 मते पडली या पॅनलचे चिन्ह पेन होते. एकूण प्रत्येकी दोन पॅनलचे 14 उमेदवार होते. एकूण 28 उमेदवार निवडून रिंगणात होते.
बाल संसद म्हणजे जबाबदारी, नेतृत्व, निर्णय क्षमता, हक्क व जबाबदाऱ्या या सर्व बाबी बालमनावर रूजवीण्यासाठी केलेला संस्कार सोहळा होय.
-सुरेखा कदम, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद कन्या शाळा,तेर.