भूम (प्रतिनिधी)-मुस्लिम एकता सामाजिक संघटनेची स्थापना 26 नोव्हेंबर विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्या दिवशी शहरात बागवान हॉल येथे आज मुस्लिम एकता सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असिफ भाई जमादार यांनी संघटनेची ध्येय धोरणे मुस्लिम बांधवाना सांगितली संघटनेच्या माध्यमातून या शहरात मुस्लिम व इतर समाजावर अन्याय झाल्यास त्यास न्याय देण्याचे काम केले जाईल. तसेच मुस्लिम युवकांना शिक्षणासाठी मदत पुरवली जाईल व तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी भव्य वाचनालय उभारण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला.
महाराष्ट्रात संघटना कार्य करणार असुन गाव तिथे शाखा तयार करुन संघटना बांधली जाईल असे त्यांनी मत व्यक्त केले. या कार्यकमाचे अध्यक्ष जिनत सय्यद जिल्हाध्यक्ष माहिला शिवसेना धाराशिव व चंद्रमणी गायकवाड ऑल इंडिया पॅन्थर सेना मराठवाडा कार्याध्यक्ष तर याप्रसंगी शहाबुद्दीन शेख संस्थापक अध्यक्ष लोकशाही फॉउंडेशन पुणे, इरफान शेख माजी नगरसेवक परंडा,जमील पठाण एम. आय. एम तालुका अध्यक्ष, ॲॅड. जफर जिनेरी, बाबु भाई तांबोळी, बाबा शेख, मामु जमादार, बबलु बागवान, आमर जमादार, निजाम शेख,बाबु मुलानी, गौस शेख, अलीम शेख, जफर पठाण, जमीर मोगल, रफीक खान आवाटी,अरफाद खान बिड, बाबा कुरेशी, सद्दाम काजी, समीर शेख करमाळा, अज्जू भाई जमादार, यजाज काझी एम आय एम अध्यक्ष, आदम शेख, बाबा शेख, समि काजी, मुईज सय्यद, अमर बादेला, कोहिनूर सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अलीम यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजू भाई शेख मुंबई यांनी केले.