भूम (प्रतिनिधी)- मराठवाडा साहित्य परिषदेचे 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर येथे दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनात संत बहिणाबाई व्यासपीठावर मा. धोंडीरामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बालकुमार मेळावा यात कथाकथन या सदरात प्रा.अलका सपकाळ यांची निवड झाली आहे. त्यांनी अनेक साहित्य संमेलनातून आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले असून त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक वृत्तपत्र, दिवाळी अंक यातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. एक संवेदनशील कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात परिचित आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या संमेलनाध्यक्षपदी ख्यातनाम लेखक डॉ.जगदीश कदम हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर समारोप ना धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होईल. संमेलनात महत्त्वपूर्ण विषयावरील पाच परिसंवाद, दोन कवी संमेलने, कथाकथन, परिचर्चा, संवाद, काव्य गायन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.