तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञी तुळजापूरात ञिपुरारी पोर्णिमा बसवण्णै पोर्णिमा म्हणून साजरी करतात. या पार्श्वभूमीवर रविवारी सांयकाळी माती किंवा साखरेच्या तयार केलेल्या मंदिरात महादेव पिंड ठेवतात. यात कुमारीकांना डोक्याला मंडवळे बांधुन महादेव पिंडीचे पुजन करुन नैवध दाखवून मंडवळे बांधलेल्या कुमारीका श्रीतुळजाभवानी मंदिरात जावुन देवीदर्शन घेतात.