तुळजापूर (प्रतिनिधी)- कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवसापासून तुलसी विवाह सोहळा आरंभ होतो साजरा करतात. त्याच पार्श्वभूमीवर द्वादशी दिनी शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सांयकाळी तुलसी विवाह सोहळ शहरात घरोघरी पार पडला. तुलसी विवाह सोहळ्या नंतर आता शुभविवाह सोहळे संपन्न होणार आहेत. त्याची तयारी सर्वञ धुमधडाक्यात सुरु आहे.
शहरवासियांनी सकाळी तुलसी कुंडे वृदावने याची रंगरंगोठी केली नंतर तुलसी विवाहासाठी लागणारे साहित्य ऊस,बोर, चिंचेची फांदी, आवळ्याची बांगड्या
फांदी दिवसा खरेदी केले. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात देखील तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते. दसरा, दिवाळी उत्सव साजरा
झाल्यानंतर नागरिकांना वेध लागते ते कार्तिक एकादशी आणि तुळशीविवाहाचे. थोरली दिवाळी म्हणून तुळशीविवाह उत्सव साजरा केला जातो. तुलसी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. अशी श्रद्धा आहे. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. घरावर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, नित्य रात्री पणत्याची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते.
तुळशी विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरु राहणार आहेत. तुळशी विवाह सोहळा संपल्यानंतर हिंदू धर्मिय लग्न कार्यालासुरुवात करतात लग्नसराईला सुरुवात
होते त्यामुळे दिवाळीमधील शेवटचा सण म्हणून तुळशी विवाहा समजला जातो. सांयकाळी शुभविवाह मुहुर्तावर प्रथम तुलसीचे पुजन करुन नैवध दाखवुन तुलसी विवाह मंगलष्टका म्हणून अक्षता टाकुन तुलसी विवाह सोहळा घरोघर पारंपारिक पध्दतीने साजरा केला गेला.