तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेस दहीदुध पंचामृत अभिषेक पुजा वेळी लोकप्रतिनिधि वगळता इतरांना व्हीआयपी दर्शन बंद असताना अनेक मंडळी अभिषेक पुजेवेळी व्हीआयपी गेटने अभिषेक पुजावेळी मंदिर गर्भगृहात सोडले जात असल्याच्या तक्रारी भाविकांमधुन केल्या आहे. दिपावली सुट्या कालावधीत अभिषेक पुजेवेळी व्हिआयपी गेटने शिफारस करुन सोडणा-यांवर सीसीटीव्ही फुटेज पाहुन कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी खुद्द श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालावे अशी अपेक्षा भाविकांमधुन केल्या जात आहेत.
दिपावली सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असुन भाविकांना दोनशे रुपये मोजुन पेड दर्शन माध्यमातून एक ते दीड तास व धर्मदर्शन रांगेतील भाविकांना तीन ते चार तास लागत आहेत. याचाच लाभ अभिषेक पुजेवेळी दर्शन घडवुन देण्याचे काम झारीतील शुक्राचार्य करीत आहेत. काही भाविकांना अभिषेक पुजेवेळी अभिषेक विनापास अदृश्य शक्ती अभिषेक हाँलच्या अलिकडच्या असणाऱ्या लोंखडी दरवाज्यातुन सुरक्षारक्षकांना हातवारे करुन सोडण्यास सांगत असल्याच्या तक्रारी भाविक व पुजारी वृदांतुन केल्या जात आहे. अभिषेक पुजेनंतर व्हीआयपी दर्शन सुरु होताच काही मंडळीना विनापेड पास व्हीआयपी दर्शन घडवत असल्याच्या तक्रारी येत आहेत .मंदिराला पुर्णवेळ तहसिलदार दर्जाचा व्यवस्थापक प्रशासक मिळुन ही मंदिरातील अनागोंदी कारभार कमी झालेला नाही. सध्या मंदिरात सर्वसामान्य भक्तांना वालीच राहिला नाही. जिल्हाधिकारी यांनी घालुन दिलेल्या सुचना नियम अटी यांचे पालन होते कि नाही हा शोधाचा विषय आहे. अभिषेक वेळचे व दिवसभराचे दर्शन रांगेत सोडणा-या ठिकाणचे सीसीटीव्हि फुटेज पाहुन सोडणा-या संबंधितावर श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.