तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील 108 पैकी ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले संगणक परिचालक विविध मागण्यांसाठी 17 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचा ऑनलाईन कामकाज वर मोठा परिणाम झाला आहे.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील 12 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम हे संगणक परिचालक करत आहेत. ग्रामपंचायतीची ऑनलाईन व ऑफलाईन व इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करूनही केवळ 6930 हजार रुपये हे अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. तेही वेळेवर मिळत नाही. संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन लवकर देऊ, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत दिल होते; परंतु शासन व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे संगणक परिचालक यांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतिबंधात घेऊन कर्मचारी संगणक परिचालकांना तत्काळ सुधारित आकृतिबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे, यासाठी 17 आँक्टोबर पासुन काम बंद आंदोलन केले सुरु केले आहे.