तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी महाविद्यालयातील प्रा. अशपाक शमशोद्दीन आत्तार 56 यांचे शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या वर ईदगाह कब्रस्तान, घाटशीळ रोड, तुळजापूर येथे सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक राजकिय सामाजिक क्षेत्रातील तसेच विध्यार्थीं मोठ्या संखेने उपस्थितीत होते.