नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे दि.15 नोव्हेंबर रोजी शहर शिवसेनेच्या वतीने म्हशी पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला गवळी बांधव तसेच पशुपालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 दिवाळी सणानिमित्त नळदुर्ग शहरात म्हशी पळविण्याची परंपरा ही फार जुनी आहे.100 वर्षांपेक्षा जास्त काळापासुन नळदुर्ग शहरात म्हशी पळविण्याची ही परंपरा आहे.शहर शिवसेनेने ही परंपरा टिकवुन ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शाम कनकधर व त्यांची संपुर्ण टीम गेल्या सात वर्षांपासुन ही म्हशी पळविण्याची स्पर्धा आयोजित करत आहेत. म्हशी पळविण्याची ही स्पर्धा म्हणजे गवळी बांधव व पशुपालकांसाठी एक सणापेक्षा कमी नाही. शहरांतील भवानी चौक ते चावडी चौक याठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दि.15 नोव्हेंबर रोजी पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन या म्हशी पळविण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पुदाले,उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, सोमनाथ म्हेत्रे, नेताजी महाबोले यांच्यासह शिवसैनिक, गवळी बांधव व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हलग्यांच्या कडकडाटात म्हशी पळविण्यात आल्या. यावेळी मोटार सायकलवरही म्हशी पळविण्यात आल्या.म्हशी पळविण्याची ही एक मोठी कला आहे. गवळी बांधव तसेच पशुपालक वर्षभर आपल्या म्हशींना स्पर्धेत कसे पळायचे याची ट्रेनिंग देतात. म्हशींना सजवुन स्पर्धेत उतरविले जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी नळदुर्ग शहरासह परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने येतात.

या स्पर्धेत खांड म्हशी पळविणे स्पर्धेत प्रथम क्रमांक अजय जाधव यांनी पटकाविला असुन त्यांना डॉ. मंगरुळे व डॉ. शेख  यांच्याकडुन ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक जगन्नाथ अवचार यांनी पटकाविला आहे त्यांना माजी नगरसेवक बसवराज धरणे यांच्याकडुन 2100 रुपये देण्यात आले.तिसरे बक्षिस लक्ष्मण धोत्रे यांनी मिळविला असुन त्यांना श्रीशैल स्वामी यांच्याकडुन पशुखाद्य व एक पोते पेंड देण्यात आले.

मोटार सायकलवरून म्हशी पळविणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मलंग शेख यांनी पटकाविला असुन त्यांना रोहीत डुकरे यांच्याकडुन पशुखाद्य व एक पोते पेंड देण्यात आले. द्वितीय बक्षिस शिवाजी घोडके यांनी मिळविला असुन त्यांना महम्मदअली कुरेशी यांच्याकडुन 1100 रुपये देण्यात आले.तिसरे बक्षिस जैनोद्दीन मकदुम शेख यांनी मिळविला असुन त्यांना अमोल कांबळे यांच्याकडुन पशुखाद्य व एक पोते पेंड देण्यात आले.सिंगल म्हशी पळविणे स्पर्धेत प्रथम क्रमांक संजय बेडगे यांनी मिळविला असुन त्यांना ऍड. अरविंद बेडगे यांच्याकडुन 1100 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक राजु कुरेशी यांनी मिळविला असुन त्यांना धनु कुलकर्णी यांच्याकडुन पशुखाद्य व एक पोते पेंड देण्यात आले.तिसरे बक्षिस गुंडु भुमकर यांनी मिळविला असुन त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन पशुखाद्य व एक पोते पेंड देण्यात आले. स्पर्धा अतिशय शांततेत व चांगल्या प्रकारे पार पडली.


 
Top