धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, उस्मानाबाद जिल्हा तामिल संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव वतीने आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार हे 18 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा वेगवेगळ्या दिवशी धाराशिव येथे येत आहेत. धाराशिव येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये 950 पैलवानांनी भाग घेतला आहे अशी माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आयोजक सुधीर पाटील यांनी दिली. तर दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. त्यानंतर कल्याण, अमरावती, धुळे, ठाणे येथील पैलवांनाच्या शो मॅच लावण्यात आल्या. 

या स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 20 मल्ल सहभागी होणार आहे. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी या स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक तथा युवा उद्योजक अभिराम पाटील, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव वामनराव गाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, अप्पा साखरे, गोविंद घारगे, आदित्य पाटील, शरद गवार, बबलू धनके, संजय पारवे, अनिकेत मोळवणे, सुंदर जवळगे, अनिल अवधूत आदी उपस्थित होते. 


65 हजार प्रेक्षकांची व्यवस्था

या कुस्ती स्पर्धा पाहता याव्यात यासाठी या मैदानावर गॅलरी उभारण्यात आली आहे. तर महिला प्रेक्षकांना स्वतंत्र विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असून राज्यभरातून येण्याऱ्या कुस्ती प्रेमींची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रेक्षक गॅलरीसाठी विविध प्रतिष्ठित मान्यवरांची व नामांकित खेळाडूंची नावे देण्यात आली असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी 45 माती व 45 गादीवर या कुस्त्या खेळविल्या जाणार आहेत. यामध्ये 900 मल्ल सहभागी होणार असून यासाठी 150 पंच मार्गदर्शक व 150 तांत्रिक अधिकारी कार्यरत राहणार आहेत. या कुस्त्यास पाहण्यासाठी 65 हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


यांची उपस्थिती 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवराज छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे भोसले, पालकमंत्री तानाजी सावंत, क्रिडा मंत्री संजय बनसोडे, श्रीमंत मालोजीराजे भोसले, भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर हे मान्यवर वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. 










 
Top