धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील 3000 हजार एकल, विधवा परितक्ता महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध करुन देण्यासाइी बंधन कोननगर व बजाज फिनसर्व्ह यांनी मागील 2 वर्षात पुढाकार घेवून सतत त्यांना विना परतावा आर्थीक पाठबळ देत रोजगार उपलब्ध (व्यवसाय स्वरुपात) करुन महिला सक्षमीकरणाची महत्वाची जबाबदारी उचलली आहे.

बंधन कोननगर ही सामाजिक संस्था महिलांना धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 ऑफीस चालु करुन 3000 महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे सामाजिक कार्य करत आहे. यानुसारच धाराशिव ऑफीस मधून  25 निराधार व विधवा महिलांना जिल्हाचे पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी  यांचे कडुन आज दि.06 नोव्हेंबर रोजी  धाराशिव  बंधन  कोननगर ऑफीस मध्ये साहित्य वाटप करण्यात आले.  तसेच पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी ऑफीस मधील कर्मचारी तसेच विधवा, परितक्ता महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. बंधन बजाज गेल्या दोन वर्षामध्ये विधवा, परितक्ता तसेच एकल महिलांना आर्थीक साहाय्य जसे की चप्प्ल दुकान, बांगडी दकान, किराणा दुकान, शिलाई मशिन, कपड्याचे दुकान, इत्यादी व्यवसायासाठी मदत करत आहे. या कार्यक्रमामध्ये बंधन कोननगरचे प्रोग्रॉम ऑफीसर फुरकन इस्लाम, जिल्हा कोऑरडीनेटर अमरिता घोप तसेच बंधन कोननगरचे विभागीय समन्वयक, शाखा व्यवस्थापक प्रज्ञावंत रणंदिवे, खेमचंद रेगर व कर्मचारी आदी उपस्थित होते.


 
Top