कळंब (प्रतिनिधी)-कळंब शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक कृती समीती यांच्या वतीने क्रांतिपीता लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे साहेब,व पी.आय.कांबळे साहेब यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी अण्णाभाऊ साठे चौक कृती समितीचे अध्यक्ष रोहित कसबे, उपाध्यक्ष अविनाश वैरागे,मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष तथा  कृती समितीचे सचिव धनंजय ताटे, कोषाध्यक्ष सनी कांबळे,हमाल माथाडी चे अध्यक्ष धनंजय भाऊ आडसुळ, वंचित बहुजन आघाडीचे अनिल हजारे, सुरज वाघमारे,सिद्धार्थ खैरमोडे,सतीष ताटे, ऋतीक कसबे,शंकर ताटे, विष्णु सिरसट, गौतम सीरसट, किरण गाडे  यांच्या हस्ते ही प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top