धाराशिव (प्रतिनिधी)-मेट्रोब्रेन एज्युकेअरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ॲबकस स्पर्धा 29ऑक्टोबर आळंदी, पुणे येथे झाली. या स्पर्धा परीक्षेत राज्यभरातून 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता  या परीक्षेत रराजवी मेट्रो ब्रेन अबॅकस धाराशिवच्या 6 विद्यार्थ्यांनी यांनी 500पैकी 500 गुण प्राप्त करून टॉपर ऑफ टॉपर पारितोषिक मिळाले तसेच 13 विद्यार्थ्यांनी यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला तसेच प्रथम द्वितीय तृतीय ॲचिव्हर पारितोषिक ही मिळाले आहे या बद्दल विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन व राजवीर मेट्रोब्रेनच्या पुर्ण टीम चे अचुक नियोजनबद्धता व पारदर्शकतेमुळे शिक्षकांचा कौतुक  होत आहे. 

राजवीर अबॅकस च्या संकेत संजय मुंडे याने 3मिनिटात 500/500 गुण प्राप्त करून झेड लेवल मध्ये प्रथम , राजवीर पद्माकर देशमुख याने 4मिनिटात 500/500गुण प्राप्त करुन ऐ लेवल मध्ये प्रथम, रणवीर प्रवीण पवार, आराध्या शरद पवार,सिद्धी बालाजी भातलवंडे, विश्वजित सतीश राठोड यां सर्वांनी 500/500 गुण प्राप्त करून टॉपर ऑफ टॉपर पारितोषिक मिळविले. मेट्रोब्रेन अबॅकसचे अध्यक्ष संतोष लोहारे सरांनी राजवीर मेट्रोब्रेनच्या संचालिका उर्मिला पद्माकर देशमुख यांना त्यांच्या कार्याबदल बेस्ट टिचर हा सन्मान केला. 

राजवीर अबॅकस च्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण- अनुज सुशील देशमुख 496 प्रथम , सम्यक राहुल वाघमारे द्वितीय (ऐ लेवल) 494,(चैत्राली बालाजी जाधव 490 द्वितीय (झेड 6), धुव प्रदीप खामकर 482 (झेड)सुमेध शैलेश देशमुख 422 द्वितीय (झेड 4), प्रतीक दत्तात्रय शिंदे 480(झेड 7) ,उमर फारुख जफरूदीन शेख 480(झेड 7), राजवीर किशोर पाटील 350(झेड रनर),पवन नागेश सुरवसे250(झेड रनर).


 
Top