नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग महसुल मंडळाचा अग्रीम विमा योजना यादीत समावेश करावा तसेच अग्रीम विमा रक्कम व उर्वरीत विमा रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी आंदोलन करण्याचे निवेदन देऊनही त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही याचा निषेध म्हणुन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दि.7 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथे शेतकऱ्यांना गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.

तुळजापुर तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या यादीत करावा, नळदुर्ग महसुल मंडळाचा समावेश अग्रीम विमा योजना यादीत समावेश करावा. अग्रीम विमा रक्कम व उर्वरीत विमा रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा याप्रकरणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते मात्र या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणुन दि.7 नोव्हेंबर रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथे बसस्थानकासमोर शेतकऱ्यांना गाजर वाटप करून सरकार व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर, दिलीप जोशी, महादेव बिराजदार, पंडीत पाटील, तोलु पाटील, बालाजी ठाकुर, प्रताप ठाकुर, महेश घोडके, रहेमान शेख, अजमोद्दीन शेख, यांच्यासह नळदुर्ग, वागदरी, शहापुर, गुळहळ्ळी या गावांतील शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी सरदारसिंग ठाकुर व दिलीप जोशी यांनी बोलताना निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top