धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील नियोजन भवन येथे  501 बचत गटांना सुमारे 10 कोटी इतक्या रकमेच्या कर्जाचे वाटप डॉ.सचिन ओंबासे,जिल्हाधिकारी धाराशिव व श्री.राहुल गुप्ता ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय स्टेट बँकेने उमेद एम एस आर एल एम यांच्या सुमारे 501 बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित केला होता या मध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील बचत गटांचा समावेश करण्यात आला होता.

या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेच्या जनरल मॅनेजर श्रीमती.मेरी सगाया धनपाल, डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.प्रियकुमार सारीगाला,धाराशिव रिजनल मॅनेजर श्री. नरसिंग कुमार मेहता व डी आर डी ए च्या प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती प्रांजल शिंदे मॅडम,लीड बँकेचे मुख्य प्रबंधक श्री.दास हे उपस्थित होते.

डॉ.सचिन ओम्बासे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटांनी शासनाच्या पी एम जी ई पी व सी एम जी ई पी या योजनांतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव बँकांकडे सादर करावेत असे आवाहन केले व भारतीय स्टेट बँक ही बचत गटांना कर्ज मंजुरी देण्यास सकारात्मक प्रतिसाद देत आहे असे नमूद केले .धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जील्हाच्या यादीत आहे त्यामुळे बचत गटांनी शासनाच्या बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा घेऊन जिल्ह्यास विकसित जिल्हा बनविण्यास मदत करावी असे आवाहनही बचत गटाच्या सभासदांना केले.

भारतीय स्टेट बँकेने रुपये 50 लाख व त्यावरील व्यावसायिक कर्जासाठी धाराशिव येथे नवीन एस एम ई शाखा सुरू केली आहे या शाखेच्या उद्घाटनासाठी व धाराशिव शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी धाराशिव येथे आले होते या प्रसंगी त्यांनी मा.जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या एकंदर विकासात भारतीय स्टेट बँकेचे भरीव योगदान राहील याची ग्वाही दिली.


 
Top