भूम (प्रतिनिधी)- शहरासह परिसरात आत्तापर्यंत गंभीर आजाराने त्रस्त असो किंवा एखादया रस्ता अपघातात गंभीर जखमी रुग्ण या सगळ्यांना वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी बार्शी किंवा धाराशिव ला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो आनी कांही वेळेस तर प्रवासा दरम्यानच कित्येक रुग्णांची तर या प्रवासातच प्राणज्योत मालवली आहे. ही होनारी हेळसांड पाहता तालुक्यातीलच रहिवाशी असणाऱ्या तसेच पेशाने डॉक्टर असणारे डॉ. राहूल घुले व डॉ. अमोल घुले बंधू यांनी भूम शहरात 1 एकरांत 100 बेडचे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असून 16/11/2023 वार गुरुवार रोजी भूम - परांडा रोड वरील जागेमध्ये. श्री. श्री महंत पीर योगी शामनाथ महाराज (पंथ नटेश्वरी), श्री. गुरु प. ब्र. 108 राचलिंग शिवाचार्य महाराज परांडकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
सौ. कमल भीमराव घुले मल्टी स्पेशलिटी चॅरिटेबल हॉस्पिटल या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये 100 अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त बेड असणार आहेत. या भूमी पूजनाच्या वेळी ह.भ.प.अरुण शाळू महाराज, बन्सी दादा डोके, मधुकर मोटे, प्रवीण रणबागुल, बाळासाहेब हाडोंगरीकर, जैन मालक,बाळासाहेब शिरसागर, आर.डी. सुळ, प्रताप देशमुख, सुग्रीव दराडे, नाना वनवे, रमेश मस्कर, हारून मुल्ला, बालाजी सावंत, प्रकाश गायकवाड, सुनील शिंदे यांच्यासह सर्व पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.