तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवार व शालेय शिक्षण मराठी भाषा मंञी दिपक केसरकर शनिवारी यांनी नवराञोत्सवात श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या दोन या दर्शनाची चर्चा सर्वञ चर्चीली जात असुन हे शक्तिपीठांमधील देवी दर्शनार्थ कशासाठी गेले. या बाबतीत अनेक तर्कविर्तक काढले जात आहेत.
विशेषता शिवसेना शिंदे गट आमदार अपाञ प्रकरण सभापती कडे असुन त्याचा निर्णय लवकरच होणार असल्याने या पार्श्वभूमीवर तर तिर्थक्षेञी जावुन शालेयशिक्षण मंञी दिपक केसरकर राञ दिवस न बघता थेट देवतांचा दारी जावुन यातुन सहसलामीत पणे बाहेर पडण्याचे साकडे घालण्यासाठी तर नाही ना अशी चर्चा सर्वञ चविष्टतेने चर्चिली जात आहे. पण शुक्रवार शिवसेनाउबाठा चे विधानपरिषदेचे सभापती अंबादास दानवे येवुन गेले त्यांचा पाठोपाठ शनिवारी शिवसेनाशिंदे गट चे शालेय शिक्षण मंञी दिपक केसरकर येवुन गेल्यामुळे सभापती बरोबरच श्रीतुळजाभवानी कुणाला कौल देणार याकडे तमाम महाराष्ट्रातील राजकिय पक्षव जनतेचे लक्ष लागणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंञी दिपक केसरकर यांनी प्रथम शुक्रवार राञी कोल्हापूरच्या अंबाआईचे दर्शन घेतले. नंतर शनिवारी सकाळी प्रथम तिर्थक्षेञ अक्कलकोट येथे येवुन स्वामी समर्थांचे दर्शन घेवुन तेथुन थेट तिर्थक्षेञ तुळजापूर गाठुन महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी आद्यशक्ति पीठ श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले नंतर नाशीक जिल्हयातीव वणी येथीला सप्तृशंगी चे दर्शन घेवुन राञी मुंबई येथे पोहचले.